वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून पोलिसाची आत्महत्या, चिट्ठीत खळबळजनक आरोप
यवतमाळ: वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून एका पोलिसाने लुंगीच्या गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना यवतमाळमध्ये घडली आहे. विष्णू कोरडे असं आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नावं आहे. ते बिटरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. सदर पोलीस कर्मचारी रजेवर असताना त्यांने लुंगीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना यवतमाळच्या पुसद शहरातील लक्ष्मी नगरामध्ये घडली आहे.
शाररिक कारणामुळे आपली बदली दुसरीकडे केल्यास काम करणं शक्य नसून, मला पुसदला बदली द्यावी; अशी मागणी मयत पोलिसाने वरिष्ठांकडे केली होती. मात्र, वारंवार मागणी करुन देखील वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे पोलिस कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्यापुर्वी चिठ्ठीत लिहून नमुद केलं आहे.
कोरडे हे आपणाला पुसद या ठिकाणी बदली हवी असल्याचं वारंवार SP साहेबांना सागंत होते. शिवाय दुसरीकडे बदली झाल्यास आपल्या शाररिक त्रासामुळे काम करणं शक्य नसल्याचंही त्यांनी वरिष्ठांना सांगितलं होतं. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपलं ऐकलं नसल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांने केला आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ हे आपल्या आत्महत्येस जबाबदार असल्याचं नमुद करत विष्णू कोरडे यांनी आत्महत्या केली आहे. या आत्महत्येमुळे पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: Suicide of a police officer due to harassment of a senior