Akole News: राहत्या घरी गळफास घेऊन एका शिक्षित विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना.
अकोले : तालुक्यातील नवलेवाडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन एका शिक्षित विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.
शुभांगी अमोल रणपिसे (वय २४, मूळ गाव मेहेंदुरी, हल्ली मुक्काम नवलेवाडी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. मयत शुभांगी यांचा भाऊ सुनील राहुल येवले यांच्या खबरीवरून अकोले पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही. दोन वर्षांपूर्वी लग्नानंतर त्या पती व सासू-सासरे यांच्या समवेत नवलेवाडी येथे राहत होत्या. त्यांचे मूळ गाव मेहेंदुरी असून माहेरदेखील मेहेंदुरी आहे.
Web Title: Suicide of a married woman in a house living in Akole
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App