अकोलेत दहावीत शिकणार्या विद्यार्थ्याची आत्महत्या
Breaking News Akole: दहावीच्या वर्गात शिकत असणार्या एका विद्यार्थ्याने ऐन परीक्षेच्या काळातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (Suicide).
अकोले: इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असणार्या एका विद्यार्थ्याने ऐन परीक्षेच्या काळातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी अकोले शहरालगत रेडे गावच्या शिवारात घडली.
साई संदीप वाघ असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. रेडे शिवारातील अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ राहणारे व अकोले नगर पंचायतमध्ये कर्मचारी असणारे संदीप जगन्नाथ वाघ यांचा साई हा मुलगा आहे. साई हा सध्या दहावीची परीक्षा देत होता, आणि तो घरात अभ्यास करत असताना त्याने हा टोकाचा निर्णय घेतला.
दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घरातील सदस्यांनी त्याच्या रूमचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र दरवाजा आतून बंद असल्यामुळे संशय निर्माण झाला. दरवाजा उघडल्यानंतर साईने गळफास घेतल्याचे आढळून आले. त्यानंतर तातडीने त्याला अकोले येथील भांडकोळी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, परंतु उपचार सुरू होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. मयत साई याचा मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता, शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
नवीन अधिक जलद बातमी मिळविण्यासाठी आपला अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज
रात्री 9 वाजता त्याच्या वर अकोले येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. साई वाघच्या आत्महत्येने अकोले तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत अकोले पोलीस ठाण्यात साईचे आजोबा जय महाराष्ट्र ग्लास हाऊसचे संचालक भारत पिंगळे यांनी खबर दिली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
Web Title: Suicide of a 10th grade student