संगमनेरात २१ वर्षीय युवकाची आत्महत्या- Suicide
Sangamner Suicide News: घोडेकर मळा येथे राहत्या घरात तरुणाने आत्महत्या केल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर शहरातील घोडेकर मळा येथील तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ओम राजेंद्र मच्चा वय २१ राहणार घोडेकर मळा, संगमनेर या युवकाने बुधवारी घोडेकर मळा येथील राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृत्यूचे कारण समजू शकले नाही. शहर पोलिसात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ओम मच्चा हा युवक अतिशय मनमिळावू स्वभावाचा होता त्याने अचानक आत्महत्येचा निर्णय का घेतला? याचा शोध पोलिस घेत आहेत. सदर घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहेत.
Business Idea in Marathi | कमी खर्चात घरबसल्या करता येणारे नवीन बिजनेस | Low Investment Business
Web Title: Suicide of 21-year-old youth in Sangamner
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App