लग्न जमत नसल्याने तरुणाने केले धक्कादायक कृत्य
Jalgaon Crime: ममुराबाद येथील एका तरुणाने लग्न होत नसल्याच्या विचारातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
जळगाव : एका तरुणाने लग्न होत नसल्याच्या नैराश्यातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील घडली. जगदीश लक्ष्मण पाटील (वय ३३) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ममुराबाद येथील रहिवासी जगदीश पाटील हा तरुण जळगाव शहरातील एमआयडीसीतील एका कंपनीत कामगार म्हणून कामाला होता. शनिवारी जगदीश हा कामवार गेला नाही. त्याचे आई वडील दोघेही कामानिमित्ताने घराबाहेर गेल्याने जगदीश हा घरी हा एकटाच होता. यादरम्यान घरी एकट्या असलेल्या जगदीशने टोकाचं पाऊल उचललं. राहत्या घरात जगदीशने छताला लोखंडी आसारीच्या कडीला लावलेल्या पंख्याला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या करत जीवन संपविले.
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जगदीशचे आई – वडील घरी परतले. दरवाजा उघडाच त्यांना घरात जगदीश याचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. जगदीशला पाहून आई – वडीलांना धक्काच बसला आणि त्यांनी हंबरडा फोडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी यांनी जगदीश यास मयत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: Suicide News marriage was not going well, the young man did a shocking act
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App