Home सांगली माय लेकीने नदीत उडी घेऊन संपवलं जीवन, कारण आलं समोर

माय लेकीने नदीत उडी घेऊन संपवलं जीवन, कारण आलं समोर

Breaking News | Suicide: बेपत्ता झालेल्या माय-लेकीने कृष्णा नदीत उडी घेऊन जीवन संपविल्याचे समोर.

Suicide My life ended by jumping into the river

मिरजः मालगाव (ता. मिरज) येथून बेपत्ता झालेल्या माय-लेकीने कृष्णा नदीत उडी घेऊन जीवन संपविल्याचे समोर आले आहे. घरातील किरकोळ वादातून दोघींनी टोकाचे पाऊल उचलले. आईचा मृतदेह म्हैसाळ येथील बंधाऱ्याजवळ तर मुलीचा मृतदेह रायबाग येथे नदीपात्रात सापडले. दीपाली अमित खांडेकर (वय 35) आणि प्राची अमित खांडेकर (वय 16) अशी मायलेकींची नावे आहे.

घरात किरकोळ वाद झाल्यानंतर मायलेकी रविवार दि. 15 जून रोजी घरातून निघून गेल्या होत्या. याबाबत नातेवाईकांनी मिरज ग्रामीण पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. ग्रामीण पोलिसांनी तातडीने दोघींचा शोध सुरू केला. मिरजेत कृष्णाघाट परिसरात सीसीटीव्हीत दोघी दिसल्या. पोलिसांनी रेस्क्यू फोर्सच्या मदतीने कृष्णा नदीत शोध मोहीम राबविली. मात्र दोघी सापडल्या नाहीत. अखेर शोध थांबविण्यात आला. दरम्यान 20 जूनरोजी प्राची खांडेकर हिचा मृतदेह कर्नाटकातील रायबाग येथे कृष्णा नदीपात्रात मिळाला. रायबाग पोलिसांनी तिच्या नातेवाइकांचा शोध घेतला. पण नातेवाईक न मिळाल्याने पोलिसांनी रायबागमध्येच अंत्यसंस्कार केले. त्यानंतर गुरुवारी म्हैसाळ बंधारा केदारनाथ मंदिर येथे कृष्णा नदीपात्रात दीपाली खांडेकर यांचा मृतदेह आढळला. स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. दोघींनी मिरजेत कृष्णाघाट येथून नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

Breaking News: Suicide My life ended by jumping into the river

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here