महिलेसह एका पुरुषाची धावत्या रेल्वेसमोर उडी, धक्कादायक घटना
Breaking News | Pune Crime: धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन महिलेसह एका पुरुषाने आत्महत्या केल्याची घटना.
Pune News: पुणे रेल्वे स्थानकाजवळ धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन महिलेसह एका पुरुषाने आत्महत्या केल्याची घटना घडली. मंगळवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. रेल्वे पुणे स्थानकावरून यार्डच्या दिशेने जात असताना दोघेही रेल्वे रुळावर झोपले. या दोघांची ओळख पटली नसून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर काल रात्री एक्स्प्रेस गाडी आली. त्यानंतर सर्व प्रवाशी या गाडीतून खाली उतरले. दरम्यान, सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही गाडी यार्डच्या दिशेने जात असताना एक पुरुष आणि एक महिला रेल्वे रुळावर जाऊन झोपले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले या दोन मृत व्यक्तींच्या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. दोघेही ४० वयोगटातील आहे. रेल्वे पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासात असून पुढील तपास सुरू आहे.
आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. प्राथमिक चौकशीत दोघांनी प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केला. पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक परिसरातून दोघे जण मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी दोघांनी अचानक धावत्या रेल्वेखाली उडी मारली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
Web Title: Suicide man and a woman jump in front of a moving train
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study