धक्कादायक! प्रेमी युगुलाने एकत्रच संपवली जीवनयात्रा
Washim crime: जंगलसदृश्य परिसरात प्रेमी युगुलाने एकत्रच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेम प्रकरणातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
वाशिम: जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील उमरदरी येथील जंगलसदृश्य परिसरात प्रेमी युगुलाने एकत्रच आपली जीवनयात्रा संपवली आहे. जंगलाच्या परिसरात झाडाच्या फांदीला एकत्रित गळफास घेऊन या प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून दोघांनीही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघेही बेपत्ता होते. मात्र आता दोघांनीही आत्महत्या केल्याचे समोर आल्याने दोन्ही कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला आहे.
लक्ष्मी ठाकरे (20 रा.कुत्तरडोह) महादेव लोखंडे ( 23 रा. कवरदरी) अशी दोन्ही मृतांची नावे असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी आणि महादेव वाशिम जिल्ह्यातील रहिवासी होते. गेल्या काही वर्षांपासून दोघांचे प्रेमसंबंध सुरु होते. मात्र त्यांच्या प्रेमाला दोघांच्याही कुटुंबियांकडून विरोध होता. यामुळे दोघेही तणावाखाली होते. शेवटी प्रेमाला होत असलेला विरोध पाहून त्यांनी घर सोडलं आणि एकमेकांसोबत एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. मात्र लक्ष्मी आणि महादेव यांनी टोकाचं पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली.
गेल्या काही दिवसांपासून दोघेही घरातून गायब होते. कुणालाही काहीत न सांगता दोघांनीही घर सोडले होते. मात्र दोघेही घरातून निघून गेल्याचे समजताच त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. कुटुंबियांनी दोघेही पळून पुण्याला गेल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरु केला होता. मात्र बुधवारी सकाळी अचानक दोघांचेही मृतदेह मालेगाव तालुक्यातील उमरदरी येथील जंगलांत आढळून आले. दोघांनीही झाडाला गळफास घेत आत्महत्या केली होती. दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्यांनी आधीच आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दोघांचेही मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. जऊळका पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
Web Title: Suicide lovers ended their journey together
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App