Home अहिल्यानगर आई-बापाने पोटाला चिमटा काढत पोराला ऑफिसर केलं, पुलावर बुलेट लावली अन्….

आई-बापाने पोटाला चिमटा काढत पोराला ऑफिसर केलं, पुलावर बुलेट लावली अन्….

Breaking News | Suicide Case: विवाह झाल्यानंतर सुखी संसार सुरू असताना २७ वर्षीय लिपिक तरुणाने गोदावरी पूलावर बुलेट उभी करत नदीपात्रात उडी घेतली.

Suicide clerk jumped into the riverbed while parking his bullet on the Godavari bridge

छत्रपती संभाजीनगर : अल्पभूधारक शेतकरी आई बापांनी पोटाला चिमटा देत मुलांना शिकवले. आई बापाच्या कष्टाचं चीज करत मुलाने लिपिक पदाची नोकरी मिळवली. ४ महिन्यांपूर्वी विवाह झाल्यानंतर सुखी संसार सुरू असताना २७ वर्षीय लिपिक तरुणाने गोदावरी पूलावर बुलेट उभी करत नदीपात्रात उडी घेतली. ही घटना जुने कायगाव येथे रविवारी घडली होती. तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान संतोषने आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप समजू शकलं नाही.

संतोष महाजन बहुरे (वय 27) रा. चांभारवाडी तालुका अंबड जिल्हा जालना असे मृतदेह आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. संतोष हा मूळचा चांभारवाडी येथील रहिवासी असून त्याचे कुटुंब अल्पभूधारक आहेत. संतोषचे वडील महाजन बहुरे आणि आई कमलाबाई बोबडे हे दाम्पत्य तुटपुंज्या कमाईत उपजीविका भागवते. त्यांनी पोटाला चिमटा देत दोन्ही मुलांना उच्च शिक्षण होईपर्यंत शिकवले. यातून मोठा मुलगा मनोज हा नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात नोकरी करतो. तर संतोष हा अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे कृषी खात्यात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. संतोष याचा चार महिन्यांपूर्वी विवाह झाला.

रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास संतोषने जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या जुन्या पुलावर बुलेट एम.एच.२१ सी.इ.७४५६ लावली. त्यानंतर संतोषने गोदावरी नदीत उडी घेतली. हा संपूर्ण प्रकार मच्छीमारांनी बघितला. वरच्या धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक जास्त असल्याने त्याचबरोबर फुगवटायक क्षेत्रात वाढलेल्या पाणी पातळीमुळे इच्छा असतानाही मच्छीमारांना त्याला वाचवता आले नाही.

दरम्यान, सोमवारी संतोषचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. नागरिकांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून ओळख पटवली. घटनेची माहिती संतोषच्या कुटुंबीयांना देण्यात आली. ज्या मुलांसाठी कष्ट करून हाडाची काळं केलं त्याच मुलाचा अंत्यविधी करण्याची वेळ आल्याने आई-वडिलांनावर आभाळ कोसळलं. तर चार महिन्यांपूर्वीच विवाह झाल्यामुळे पत्नी प्रियाने टाहो फोडला होता.

Breaking News: Suicide clerk jumped into the riverbed while parking his bullet on the Godavari bridge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here