Home संगमनेर Suicide | संगमनेर तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide | संगमनेर तालुक्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide by strangulation in Sangamner taluka

Sangamner | संगमनेर: तालुक्याच्या पठार भागातील नांदूरगावाअंतर्गत असणाऱ्या लहुचा मळा येथील २३ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे.  ही घटना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

किरण दिलीप मंडलीक (वय २३) रा. लहूचामळा ता. संगमनेर असे मयत तरुणाचे नाव आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  किरण मंडलिक हा तरुण आपल्या आईवडिलांसोबत लहूचामळा येथे राहत होता. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे जेवण झाल्यानंतर कुटूंबातील सर्व सदस्य झोपले होते. त्यानंतर किरणने कुटुंबातील मंडळी झोपेत असताना घराशेजारील टॉयलेटमध्ये जाऊन लोखंडी अॅंगलला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.

त्यानंतर घरातील सदस्यांना हि घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केला. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू खेडकर, नामदेव बिरे आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. व पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी खासगी रुग्णवाहीकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला.

याप्रकरणी गणपत विठ्ठल मंडलीक यांच्या खबरीवरुन घारगांव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान किरण मंडलिक याने आत्महत्या का केली यामागील कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. या घटनेने परीसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Suicide by strangulation in Sangamner taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here