Home अहमदनगर Suicide | विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, पतीस अटक

Suicide | विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, पतीस अटक

Suicide by hanging of married woman, husband arrested

Ahmednagar | पाथर्डी | Pathardi: पती व त्याच्या कुटुंबीयांच्या मानसिक त्रासाला कंटाळून पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पाथर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विवाहित महिलेच्या पतीस अटक (Arrested) करण्यात आली आहे.

आरोपी समीर महमंद शेख यास पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की.  या घटनेबाबत आत्महत्या केलेल्या विवाहितेचे वडील बनेमिया जानमहंमद पठाण राहणार बोधेगाव (ता.शेवगाव) यांनी पाथर्डी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांची मुलगी करिष्मा समीर शेख हिला तिचा पती समीर महंमद शेख हा सातत्याने मारहान करुण मानसिक त्रास द्यायचा. त्याच्या व कुटुंबीयाच्या त्रासाला कंटाळून मुलीने करंजी येथे 1 जून रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यामुळे संबंधितांच्या विरोधात पठाण यांनी मुलीस आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अरविंद चव्हाण पुढील तपास करत आहेत.

Web Title: Suicide by hanging of married woman, husband arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here