संगमनेर तालुक्यात राहत्या घरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
संगमनेर: तालुक्यातील घुलेवाडी येथील एका २३ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रथमेश दीपक राउत वय २३ रा. घुलेवाडी असे या तरुणाचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी घरात कोणीही नसताना प्रथमेश राउत याने घराची आतून कडी लावून घेतली. आणि दोरीच्या सहायाने गळफास घेत आपले जीवन संपविले. काही वेळानंतर घरातील व्यक्तीनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र घरातून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता ही घटना समोर आली. घरच्यांनी त्याला दवाखान्यात नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या घटनेची माहिती समजताच सहायक पोलीस निरीक्षक साबळे व सहकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. प्रथमेश याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Web Title: Suicide by hanging of a youth in a house in Sangamner