Suicide: राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या
Ahmednagar | Shrirampur Suicide News: राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या, यामागील कारण अद्याप समजू शकले नाही.
श्रीरामपूर: शहरातील मोरगेवस्ती परिसरातील एकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली आहे.
शहरातील वॉर्ड क्र. ७, मोरगेवस्ती परिसरातील बंडू तात्याबा काळे (वय ४४) यांनी राहत्या घरात गळफास घेतला. त्यांच्या नातेवाईकांनी काळे यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी काळे मयत झाल्याची खबर शहर पोलिसांत दिली. त्यावरुन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काळे यांचा वायरिंगचा व्यवसाय होता. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा, बहिण, भाऊ, वडील असा परिवार आहे. काळे यांनी कोणत्या कारणाने आत्महत्या केली यामागील कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. जाधव पुढील तपास करीत आहेत.
Web Title: Suicide by hanging in residential house