अहमदनगर: खडीक्रशरवरच गळफास घेत आत्महत्या
Breaking News | Ahmednagar: खडीक्रशरवर काम करणाऱ्या परजिल्ह्यातील कामगाराने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
अहमदनगर: खडीक्रशरवर काम करणाऱ्या परजिल्ह्यातील कामगाराने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील वारुळवाडी येथे शुक्रवारी (दि. ३१) सकाळी घडली. संतोष गंगाराम पंडित (वय ३५, मूळ रा. ब्राह्मणवाडा, हिंगोली, हल्ली रा. शेंडी- पोखर्डी, ता. नगर) असे मृताचे नाव आहे.
मृत संतोष पंडित हा गेल्या काही दिवसांपासून वारुळवाडी शिवारात असलेल्या खडीक्रशरवर काम करत होता. शुक्रवारी (दि. ३१) सकाळी कामावर आल्यावर त्याने खडीक्रशरवरच गळफास घेतला. ही बाब लक्षात आल्यावर त्याचा भाऊ
दादाराम मुकुंदा पंडित याने त्यास उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी भिंगार कम्प पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल विधाते करत आहेत.
Web Title: Suicide by hanging himself on the gravel crusher
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study