अहमदनगर ब्रेकिंग: जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परिसरात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Ahmednagar: जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या दालनाबाहेरच तरुणाची विषारी पदार्थ घेऊन आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केल्याची घटना घडल्याने एकच खळबळ.
अहमदनगर: येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधिक्षकांच्या दालनाबाहेरच एका युवकाने विषारी पदार्थ घेऊन आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. दिगंबर संतराम शिंदे (वय 22, रा. लाडजळगाव, ता. शेवगाव) असे या युवकाचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, शिंदे यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलीस अधीक्षक राकेश ओला हे प्रशासकीय कामानिमित्त बाहेरगावी आहेत. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शिंदे हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आला व पोलीस अधिक्षकांच्या दालनाबाहेर असलेल्या बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी जाऊन बसला होता. त्यानंतर काही वेळातच त्याने त्याच्याकडील बाटली काढून विषारी पदार्थ प्राशन केला. तेथील कर्मचार्यांच्या लक्षात ही बाब येताच, त्यांनी वरिष्ठ अधिकार्यांना कल्पना दिली. शहर विभागाचे उपअधीक्षक अनिल कातकाडे, गृह शाखेचे उपअधीक्षक मेघश्याम डांगे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
उपअधीक्षक कातकाडे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ कर्मचार्यांना बोलावून घेत शिंदे याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रवाना केले. भिंगार कॅम्प पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्यासह कर्मचारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाले. रुग्णालयात शिंदे याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शिंदे याने शेवगाव पोलीस ठाण्यात एक तक्रार दिलेली आहे. त्याची चौकशी सुरू आहे. यासंदर्भात तो पोलीस अधीक्षक कार्यालयात आलेला होता, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. चौकशी केल्यानंतर अधिक माहिती समोर येईल,असे उपअधीक्षक कातकाडे यांनी सांगितले.
Web Title: Suicide attempt of a youth in Ahmednagar Superintendent of Police office area
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App