Murder Case: ऊसतोडणी मजुराचा खून करणारा २४ तासांत गजाआड
Murder Case: पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : ऊसतोडणी मजुराचा खून करणारा गजाआड (Arrested), एक आरोपी फरार.
करंजी : मुकादमाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या खडांबे (ता. राहुरी) येथील संजय माळी यांच्या खुनाचा गुन्हा पाथर्डी पोलिसांनी दाखल केला. यातील आरोपी मुकादम अशोक जाधव याला एका दिवसात अटक केली. गुन्ह्यातील दुसरा आरोपी फरार झाला.
खडांबे येथील संजय काशिनाथ झाला. माळी व सोमनाथ पांडुरंग दळवी (वय ३९) या ऊसतोडणी कामगारास मुकादम अशोक जाधव (रा. हारेवाडी, ता. आष्टी, जि. बीड) व भागीनाथ धोंडीबा पांढरपिसे (रा. मोहोजदेवढे, ता. पाथर्डी) यांनी उचल दिली होती; परंतु, संजय माळी यांना काही कारणामुळे ऊसतोडणीसाठी कारखान्यांवर जाण्यास उशीर झाला. याचा राग मनात ठेवून मुकादम अशोक जाधव व भागीनाथ पांढरपिसे यांनी त्यांना त्यांच्या खडांबे गावी जाऊन आणले. अशोक जाधव यांच्या हारेवाडी गावातील खोलीत ठेवून त्यांना काठ्यांनी जबर मारहाण केली. त्यातच संजय काशिनाथ माळी यांचा मृत्यू झाला.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी संजय माळीचा जोडीदार सोमनाथ फरार झाला. पांडुरंग दळवी यांना आरोपींनी खोटे सांगितले. संजय यांना दवाखान्यात घेऊन चालल्याचे सांगितले. दुचाकीवर दोघांच्या मध्ये बसवून करंजी घाटात आणून कठड्यावरून संजय यांना त्यांनी खाली ढकलून दिले. सोमनाथ दळवी यास हे कोणाला सांगायचे नाही, असा धमकी दोघा आरोपींनी दिली. सोमनाथ दळवीने ही हकीगत पाथर्डी पोलिसांना सांगितली.
पाथर्डी पोलिसांनी सोमनाथ दळवी याच्या फिर्यादीवरून भादंवि कलम ३०२, २०१, ३४२, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी अशोक जाधव यास चोवीस तासात अटक केली. साथीदार भागीनाथ पांढरपिसे फरार झाला आहे.
याकामी पाथर्डीचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, प्रवीण पाटील, कायदे पो. कॉ. अरविंद चव्हाण, सतीश खोमणे, किशोर पालवे, अमोल आंधळे यांनी विशेष कामगिरी बजावली.
Web Title: Sugarcane worker’s Murder Arrested within 24 hours