अहमदनगर: ऊसतोड मजुराचा तलावात बुडून मृत्यू
Ahmednagar News: अंघोळीसाठी तलावावर गेलेला ऊसतोड मजूर पाय घसरून पडला. पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना. (drowned)
अहमदनगर: अंघोळीसाठी तलावावर गेलेला ऊसतोड मजूर पाय घसरून पडला. पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. मयत मजूर आष्टी तालुक्यातील आहे.
कडा येथील मनोज विलास कवडे (वय २६) हा तरुण दोन महिन्यांपूर्वी नगर जिल्ह्यातील अंबालिका साखर कारखान्यावर ऊसतोडीसाठी गेला होता. सिद्धटेक जवळ असलेल्या तलावावर गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मनोज अंघोळीसाठी गेला होता. अंघोळ करताना त्याचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात बुडाला. पोहता येत नसल्याने त्याचा मृत्यू झाला, मनौज उशिरापर्यंत परत न आल्याने इतर मजुरांनी त्याचा शोध घेतला, तलावाच्या कडेला कपड़े आढळून आल्यानंतर मजुरांना मनोज पाण्यात बुडाल्याचा संशय आला. शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांसह इतर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी शोधकार्य केले. त्यानंतर सायंकाळी त्याचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहावर रात्री उशिरा कडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोजच्या पश्चात आई, तीन भाऊ असा परिवार आहे.
Web Title: Sugarcane worker drowned in lake
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App