Home अहमदनगर संगमनेर: विदयुत वाहिनीला ऊसाच्या ट्रकचे घर्षण झाल्याने ट्रक पेटला, चालक ठार

संगमनेर: विदयुत वाहिनीला ऊसाच्या ट्रकचे घर्षण झाल्याने ट्रक पेटला, चालक ठार

Breaking News | Sangamner:  रस्त्यावरुन जाणाऱ्या विदयुत वाहिनीला ऊसाच्या ट्रकचे घर्षण झाल्याने ट्रक पेटला तर चालक ठार झाल्याची घटना.

sugarcane truck collided with a power line, causing the truck to burst into flames, killing the driver

संगमनेर: तालुक्यातील पठार भागातील असणाऱ्या खांबे – वरवंडी शिवाच्या रस्त्यावरुन जाणाऱ्या विदयुत वाहिनीला ऊसाच्या ट्रकचे घर्षण झाल्याने ट्रक पेटला तर चालक संतोष राणू मोटे ( वय 45) हे जागेवर ठार झाल्याची घटना घडलीय. संगमनेर तालुक्यातील खांबा वंरवंडी शिवारात  ही घटना घडली आहे

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की,   एम एच 14 बी जे 2251 या क्रमांकाची ट्रक ऊस भरुन संगमनेर साखर कारखान्याकडे जात असताना खांबे – वरवंडी शिवा जवळील रस्ता क्रोस करुन गेलेल्या विदयुत वाहिनी ( तार ) ऊसाने भरलेला ट्रकचे घर्षण झाल्याने संपूर्ण ट्रक वर करंट उतरुन ऊसाच्या ट्रकने पेट घेतला व चालक संतोष मोटे हे जागेवर शॉक बसून मृत झाले ही खबर वाऱ्यासारखी पसरल्याने संगमनेर साखर कारखान्यामधून तातडीने अग्नीशामकला पाचरण करण्यात आल्याने पुढील होणारे मोठे नुकसान टळले मात्र दुर्दवी चालक संतोष मोटे हे जागेवरचं शॉक बसून मृत झाले.

राहुरी तालुक्यातील म्हैसगाव इथून संगमनेर कारखान्याला ऊस घेऊन येणाऱ्या MH- 14 DJ- 22 51 या गाडीचा विद्युत तारेशी संपर्क आल्यामुळे अचानक गाडीने पेट घेत गाडीमध्ये करंट उतरल्यामुळे चालकाचा मृत्यू झाला आहे.

स्थानिक रहिवाशांच्या मदतीने विद्युत पुरवठा बंद करत गाडीला लागलेली आग विझवण्यात आली आहे. 

Web Title: sugarcane truck collided with a power line, causing the truck to burst into flames, killing the driver

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here