Home Accident News Accident | संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाट पायथ्याशी ऊस वाहतूक ट्रॅक्टरचा...
Accident | संगमनेर: पुणे नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाट पायथ्याशी ऊस वाहतूक ट्रॅक्टरचा अपघात
संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यात पुणे नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाट पायथ्याशी उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर उलटून अपघात घडल्याची घटना आज सकाळी घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
तालुक्यातील मांडवे येथून उस घेऊन येणारा ट्रॅक्टर हायवेवर उलटण्याची घटना घडली आहे. सकाळीच हा अपघात झाल्याने नाशिकला जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण झाला होता. काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. नंतर लगेच महामार्ग कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.
Web Title: Sugarcane transport tractor accident at Sangamner