त्रासास कंटाळून तरुणीची आत्महत्या, देवाच्या यात्रेच्या ठिकाणी गळफास
Breaking News | Solapur Crime: गावातील काहींच्या त्रासास कंटाळून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील एका गावात घडली.
सोलापूर : गावातील काहींच्या त्रासास कंटाळून तरुणीने आत्महत्या केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार एकाच कुटुंबातील तिघाजणांविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मोहोळ तालुक्यातील एका गावात देवाच्या यात्रेसाठी मृत तरुणी आपल्या कुटुंबीयांसह आली होती.
तेथे संबंधित तिघांनी तिला त्रास देऊन तिचे जगणे मुश्कील केले. त्यामुळे तिने वैतागून त्याच गावात देवाच्या यात्रेच्या ठिकाणी गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. गेल्या २ मे रोजी रात्री हा प्रकार घडला होता. त्याबद्दल दाखल झालेल्या तक्रारीची चौकशी दुसऱ्या पोलीस ठाण्यात तिघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर हा गुन्हा मोहोळ पोलीस ठाण्यात वर्ग झाला. पुढील तपास मोहोळ पोलीस करीत आहेत. यात संबंधितांपैकी कोणालाही अद्याप अटक झालेली नाही.
Breaking News: suffering, young woman commits suicide, hangs herself at God’s pilgrimage