Home Suicide News कर्जबाजारीपणास कंटाळून उपसरपंचाची आत्महत्या, या गावात घडली घटना

कर्जबाजारीपणास कंटाळून उपसरपंचाची आत्महत्या, या गावात घडली घटना

Sub-panch commits suicide due to debt bondage

नेवासा | Suicide: नेवासा तालुक्यातील सुरेगाव गंगा या गावातील ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील वसंत शिंदे वय ५० यांनी गोदावरी नदीत उडी घेऊन आपले जीवन संपविल्याची घटना घडली आहे.

कर्जबाजारीपणा व अति पावसाने झालेल्या नुकसानीस कंटाळून सुनील शिंदे ११ ऑक्टोबर रोजी प्रवरासंगम पुलावरून नदीत उडी घेऊन आत्महत्या केली असावी अशी माहिती निकटवर्ती ग्रामस्थांकडून मिळत आहे.

प्रवरा संगम येथील गोदावरी नदी पुलावर त्यांची मोटारसायकल व चपला आढळून आल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता निर्माण झाल्याने दि.11 पासून नदी पात्रात शोध सुरू केला होता.

दोन दिवस मृतदेह सापडला नसल्याने गूढ निर्माण झालेले होते. मात्र आज दि.13 रोजी सकाळी मृतदेह नदीत पाण्यावर तरंगताना आढळून आल्याने सुनीलने आत्महत्या (suicide)केल्याचे स्पष्ट झाले. सुरेगाव येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Sub-panch commits suicide due to debt bondage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here