Home अहमदनगर नगरहून सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या एस. टी. बसवर दगडफेक

नगरहून सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या एस. टी. बसवर दगडफेक

Breaking News | Ahmednagar: या दगडफेकीत एस.टी. बसच्या काचा फुटून काहीसे नुकसान झाले. मात्र, सर्व विद्यार्थी व शिक्षक सुखरूप.

students who went on a trip from the city. T. Stone pelting at bus

अहमदनगर : नगरहून सहलीला गेलेल्या विद्यार्थ्यांच्या एस. टी. बसवर कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौक येथे दगडफेक झाल्याची घटना बुधवारी (दि.३१) सायंकाळी घडली. या बसमध्ये नगर तालुक्यातील सोनेवाडी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी सहलीला गेलेले होते. या दगडफेकीत एस.टी. बसच्या काचा फुटून काहीसे नुकसान झाले. मात्र, सर्व विद्यार्थी व शिक्षक सुखरूप असल्याचे शाळा व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

नगर तालुक्यातील सोनेवाडी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाचे ४३ विद्यार्थी एस. टी. महामंडळाच्या बसने बुधवारी (दि.३१) पहाटे सहलीला रवाना झाले होते. सायंकाळी ६ वा. च्या सुमारास ते कोल्हापूर येथे पोहचले. कोल्हापूरमध्ये सध्या अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. तसेच शाळेच्या सहलीदेखील कोल्हापुरात येत आहेत. या सर्व भाविक आणि पर्यटकांच्या गाड्यांची पार्किंगची व्यवस्था दसरा

चौकच्या पार्किंगमध्ये करण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी ही बस जात होती. बसमध्ये विद्यार्थी गाण्याच्या भेंड्या तसेच राम नामाचा जयघोष, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा देत होते, त्यावेळी अचानक जमावाने बसवर दगडफेक केली. त्याचबरोबर आणखी दोन चारचाकी वाहनांची तोडफोड अज्ञातांनी केली. अचानक झालेल्या प्रकारामुळे सर्वजण गोंधळून गेले.

दरम्यान, दगडफेक झाल्यानंतर जमाव पसार झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी गेला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. या दगडफेकीत

बसच्या काचा फुटल्या. मात्र, सर्व विद्यार्थी सुखरूप असून, सहल नियोजनाप्रमाणे सुरु झाली. नियोजित वेळेनुसार गुरुवारी (दि.१) रात्री सहलीची बस सोनेवाडी येथे येणार असल्याचे मुख्याध्यापक दिपक काकडे यांनी सांगितले.

कोल्हापूर शहरात बुधवारी (दि.३१) सकाळपासून एका धार्मिक स्थळाच्या अतिक्रमणच्या मुद्यावरून गोंधळ सुरू होता. दरम्यान, येथील दसरा चौकातील मैदानावरील वाहनतळ येथे सहलीसाठी आलेल्या गाड्या थांबवल्या जात असताना नगरच्या बसमधील विद्यार्थी ‘जय श्रीराम ‘च्या घोषणा देत होते. त्या विद्यार्थ्यांना कोल्हापूरमध्ये कशामुळे तणावाचे वातावरण आहे, हे हे माहितही माहितही नव्हते. मात्र, या घोषणा ऐकून या परिसरातील समाजकंटकांच्या जमावाने बसवर दगडफेक केल्याचे सांगण्यात आले.

Web Title: students who went on a trip from the city. T. Stone pelting at bus

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here