Rape: विद्यार्थीनीवर स्कूल व्हॅनचालकानेच केला बलात्कार
Nagpur Rape Case: स्कूल व्हॅन चालकाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना.
नागपूर: महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरात एका स्कूल व्हॅन चालकाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. तब्बल २५ दिवसांनी हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पवन कोहपरे असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पवन हा स्कूल व्हॅनचालक आहे. पीडित १५ वर्षीय विद्यार्थीनी अनेक दिवसांपासून त्याच्याच व्हॅनमधून शाळेचा प्रवास करीत होती. स्कूल व्हॅनचालक आणि पीडित मुलगी अनेक दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते.
१५ ऑक्टोबर रोजी आरोपीने संधीचा फायदा घेत आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार करत असताना आरोपीने व्हिडीओ क्लिपही बनवली होती.
या क्लिपच्या आधारे आरोपी पवन हा पीडित मुलीला ब्लॅकमेल करत होता. आरोपीच्या कृत्याला कंटाळून अखेर पीडितेने घडलेली सर्व हकीकत आपल्या आई-वडिलांना सांगितली. मुलीवर अत्याचार झाल्याचं कळताच, त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दरम्यान, पीडित मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पवन कोहपरे याच्याविरोधात पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटकही केली आहे.
Web Title: student was rape by the school van driver
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App