मित्र-मैत्रिणीसोबत सेल्फी काढताना हातातून मोबाईल निसटला अन.
खदानीत पडून पाण्यात बुडल्याने (Drowned) एका विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू (Death) झाल्याची घटना.
जालना: मित्र-मैत्रिणीसोबत सेल्फी काढताना तोल जाऊन खदानीत पडून पाण्यात बुडल्याने एका विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना जालन्यातील खरपुडी शिवारात घडली. कैलास गिरी असे या विद्यार्थ्यांचे नाव असून हा विद्यार्थी कृषी तंत्र विद्यालयात शिक्षण घेत आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कैलास गिरी हा आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तीन मित्र आणि दोन मैत्रिणींसोबत फोटोशूट करण्यासाठी खदानीच्या काठावर गेला होता. या दरम्यान सेल्फी काढताना त्याचा मोबाईल हातातून निसटला आणि पाण्यात पडला.
Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी
मोबाईल शोधण्याच्या नादात तो खदानीत उतरण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा तोल गेला. यात तो पाण्यात पडल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यासह अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: student died due to drowned in the quarry
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App