महाविद्यालयाच्या वसतिगृहात विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या
Suicide Case: नाशिक केटीएचएम महाविदयालयाच्या मुलांच्या वस्तीगृहात २१ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना.
नाशिक : गंगापूर रोडवरील मविप्र संस्थेच्या केटीएचएम महाविदयालयाच्या मुलांच्या वस्तीगृहात २१ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्त्या केल्याची खळबळजनक घटना घडली. गौरव रमेश बोरसे (२१, मूळ रा. डांगसौंदाणे, ता. सटाणा) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. गौरव वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षाच्या वर्गात शिक्षण घेत होता.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गौरव बोरसे हा केटीएचएम महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतीगृहात राहत होता. मंगळवारी (ता. २२) सकाळी गौरव राहत असलेल्या शेजारील खोलीतील मुलगा त्यांच्याकडे इस्त्री घेण्यासाठी गेला. त्यावेळी त्याने गौरवच्या खोलीचा दरवाजा वाजविला. मात्र तो दरवाजा उघडत नसल्याने सदरील माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यानंतर दरवाजा उघडून पाहिले असता गौरव याने गळफास घेतला असल्याचे आढळून आले.
याप्रकरणी तत्काळ सरकारवाडा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. गौरवचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या आवारात नातलगांसह त्याच्या मित्रांनी गर्दी केली होती. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत होती.
Web Title: student committed suicide by hanging himself in the college hostel
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App