Home महाराष्ट्र ‘सॉरी पप्पा’ म्हणत विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

‘सॉरी पप्पा’ म्हणत विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

Breaking News | Suicide Case: ‘सॉरी पप्पा’ असा उल्लेख चिठ्ठीमध्ये करीत बसवेश्वर चौकातील राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या.

student committed suicide by hanging herself saying 'sorry papa'

लातूर : ‘सॉरी पप्पा’ असा उल्लेख चिठ्ठीमध्ये करीत बसवेश्वर चौकातील राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. विज्ञान शाखेत इयत्ता ११ वीमधील विद्यार्थीनीने हॉस्टेलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ६ च्या दरम्यान घडली.

 आदिती आंगद यादव (वय १७ रा. विजारी ता. वाशी, जि. धाराशिव) असे गळफास घेतलेल्या विद्यार्थिनीची नाव आहे. माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने राजर्षी शाहू महाविद्यालयात प्रवेश मृत आदिती यादव घेतला होता. गुरुवारी दुपारी ४ च्या दरम्यान, दहावीत १०० टक्के गुण घेऊनही नैराश्यात होती आदिती आदिती ही आपल्या दोन मैत्रिणीसोबत कॉलेजहून हॉस्टेलकडे आली होती. तिच्या मैत्रिणी या स्टडी रुमकडे अभ्यासासाठी गेल्या मात्र, आदिती ही रुममध्येच होती. सायंकाळी ६ च्या दरम्यान तिच्या मैत्रिणी रुमकडे परतल्या असता त्यांना आदितीने गळफास घेतल्याचे दिसून आले. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी घटनेची माहिती गांधी चौक पोलीस ठाण्यात देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पंचनामा करीत असताना पोलिसांना एक चिठ्ठी आढळून आली. त्यामध्ये केवळ ‘सॉरी पप्पा’ आणि आदिती एवढाच उल्लेख होता. आदितीचे वडील हे शेतकरी असून त्यांना दीड एकर शेती आहे. घरची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यानेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे वडिल आंगद यादव यांनी जबाबामध्ये सांगितले.

पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक निखील पवार हे अधिक तपास करीत आहेत. आदिती दहावीमध्ये टॉपर आदितीचे माध्यमिक शिक्षण हे धाराशिव येथे झाले होते. लहानपणापासूनच ती अभ्यासामध्ये हुशार होती. इयत्ता १० वीमध्ये तर तिला १०० टक्के गुण मिळाले होते. त्यामुळेच लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालयात तिला प्रवेश मिळाला होता. या घटनेने तिच्या मूळ गावी विजोरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: student committed suicide by hanging herself saying ‘sorry papa’

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here