Home अहमदनगर अहमदनगर: विद्यार्थ्याची राहत्या घरात आत्महत्या

अहमदनगर: विद्यार्थ्याची राहत्या घरात आत्महत्या

Breaking News | Ahmednagar News: नववीत शिकणाऱ्या विद्याथ्यनि राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

Student commits suicide in residential house

जामखेड:  शहरातील बराटे वस्ती येथील नववीत शिकणाऱ्या विद्याथ्यनि राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नसून, जामखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शिवम ज्ञानेश्वर बोराटे (वय १५) असे त्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शिवम आज (मंगळवार) सकाळी आपल्या किराणा दुकानात बसला होता. यानंतर शाळेची वेळ झाल्याने त्याची आई घरातून दुकानात आलो व त्याला शाळेत जाण्यासाठी तयारी कर, असे म्हणून घरी जाण्यास सांगितले. यानंतर तो दुसऱ्या मजल्यावर गेला व सकाळी दहाच्या सुमारास दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली, शिवम याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Student commits suicide in residential house

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here