Home जळगाव ‘ती येत नाही तोपर्यंत…’, इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवून कॉलेजच्या आवारातच तरुणाने  संपविले जीवन

‘ती येत नाही तोपर्यंत…’, इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवून कॉलेजच्या आवारातच तरुणाने  संपविले जीवन

Jalgaon Crime News: जळगाव येथे प्रेमभंग कारणातून विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

Student commits suicide by hanging himself due to love breakup

जळगाव: जळगावात एक अंगावर शहारे आणणारी घटना घडली आहे. प्रेमभंग झाल्याच्या कारणातून विद्यार्थ्याने कॉलेजच्या आवारातच गळफास घेतल्याचे प्रकरण समोर आले आहे. विद्यार्थी सकाळी कॉलेजमध्ये आल्यावर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इन्स्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक स्टेटसदेखील या तरुणाने पोस्ट केले होते. जळगाव येथे ही भयंकर घटना घडली आहे. सत्तू कोळी असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

प्रेमभंगाच्या दुःखातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने थेट जळगावच्या सुट्टीच्या दिवशी महाविद्यालयाच्या आवारातील झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सत्तू कोळी असे या मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो शहरातील एका दुसऱ्या महाविद्यालयात शिक्षण घेत होता. आत्महत्या करण्यापूर्वी सत्तू कोळी याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावनिक स्टेटस देखील पोस्ट केले होते.

इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत त्याने स्टेटसदेखील ठेवले होते. जोपर्यंत ती येत नाही तोपर्यंत मला खाली उतरवू नका आणि माझ्यावर अंत्यसंस्कार करू नका, असा व्हिडिओ केला होता. त्यानंतर त्याने महाविद्यालयाच्या आवारातील एका झाडाला गळफास लावून आयुष्य संपवले. सकाळी कॉलेजमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात ही बाब येताच तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

Breaking News: Student commits suicide by hanging himself due to love breakup

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here