Home पुणे विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

Pune Suicide News: दहावीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

Student commits suicide by hanging

पुणे : दहावीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हडपसर भागातील महमदवाडी परिसरात घडली. दोन दिवसांवर पूर्वपरीक्षा येऊन ठेपली असताना विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शोककळा पसरली.

रेहा प्रशांत वर्गीस असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  रेहा दहावीत होती. दोन दिवसानंतर पूर्वपरीक्षा सुरू होणार होती. शुक्रवारी सायंकाळी घरात कोणी नव्हते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास तिने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. रेहाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

पोलिसांनी पालकांकडे चौकशी केली. दोन दिवसानंतर दहावीची पूर्वपरीक्षा सुरू होणार होती. अभ्यासाच्या तणावामुळे  तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Student commits suicide by hanging

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here