चंदनापुरी घाटात सात वाहनांचा विचित्र अपघात
Breaking News | Sangamner Accident: सात वेगवेगळी वाहने एकमेकांवर धडकल्याने झालेल्या विचित्र अपघातात वाहनांचे मोठे नुकसान.
संगमनेर : चंदनापुरी घाटात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने हा ट्रक समोरच्या दुसऱ्या ट्रकला धडकला. यात सात वेगवेगळी वाहने एकमेकांवर धडकल्याने झालेल्या विचित्र अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले. मात्र कुठली जीवित हानी झाली नाही. ही घटना गुरुवारी सायंकाळी सात वाजता घडली.
याबाबत समजलेला माहितीनुसार, काल गुरुवारी सात वाजण्याच्या सुमारास नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील संगमनेर तालुक्यात चंदनापुरी घाटात मंचरवरून ऊस घेऊन लोणी प्रवरेकडे ऊस वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एमएच ४१ एक यु ७३०७ याचे ब्रेक फेल झाले. चंदनापुरी घाटात काँक्रिटीकारणाचे काम सुरू असल्याने अगोदरच वाहतूक विस्कळीत झालेली आहे. यातच ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने हा ट्रक समोरील वाहनावर धडकला. यामुळे इतरही सात वाहने एकमेकांवर धडकली या विचित्र अपघातात सात वाहनांचे नुकसान झाले. अचानक झालेल्या घटनेने रस्त्याने जाणारी वाहन चालकांना याचा त्रास झाला. या अपघातात कोणती जीवित हानी झाली नसली तरी वाहनांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
सध्या काँक्रिटीकरणाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. यामुळे एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. उतारामुळे अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. नियोजनाच्या अभावामुळे रस्ता वाहतूक योग्य प्रकारे हाताळण्यास टोल प्रशासनाला अपयश आले आहे.
Web Title: Strange accident involving seven vehicles at Chandanapuri