Home अहमदनगर संगमनेरात जमावाकडून दगडफेक व्यावसायीकेचे नुकसान, १२ जणांविरुद्ध गुन्हा

संगमनेरात जमावाकडून दगडफेक व्यावसायीकेचे नुकसान, १२ जणांविरुद्ध गुन्हा

Breaking News | Sangamner Crime: व्यावसायिकास धक्काबुक्की, शिविगाळ, दमदाटी करुन तसेच दगडफेक करुन त्याच्या शेडचे नुकसान.

Stone pelting business damaged by mob in Sangamaner crime filed

संगमनेर: बेकायदेशिर जमाव करुन व्यावसायिकास धक्काबुक्की, शिविगाळ, दमदाटी करुन तसेच दगडफेक करुन त्याच्या शेडचे नुकसान केले. ही घटना शहरा तील मालदाड रोड येथील दत्तनगर परिसरात घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरातील दत्तनगर येथे जमावाने दशरथ बबन सातपुते यांना शिवीगाळ करून धमकी देऊन शेडवर दगडफेक केली. यामुळे सातपुते यांच्या शेडचे मोठे नुकसान झाले. याबाबत त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून रा- हुरी पोलिस ठाण्यात धिरज सोमनाथ ढगे (रा. स्ट्रॉबेरी स्कुल रोड), राजु यादव खरात (रा. लक्ष्मीनगर), रविंद्र अरुण गिरी (रा. घुलेवाडी), सुनिल जाधव (रा. वेल्हाळे), साईनाथ शिंदे (शिवाजीनगर संगमनेर), संतोष घेगडमल (रा. कासारवाडी), प्रविण देवेंद्र गायकवाड (रा. समनापुर), विजय खरात (रा. घुलेवाडी), दिपक बाळु सा- तपुते (मालदाड रोड), रुपाली धिरज ढगे, जयाताई डोळस (रा. चैतन्यनगर), मेश्राम या बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार लोखंडे करत आहे.

Web Title: Stone pelting business damaged by mob in Sangamaner crime filed

See also: Breaking News live,  Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation StudyCrime News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here