आक्षेपार्ह भाषा वापरल्याने राज्यातील या मंत्र्याच्या घरावर दगडफेक
Aurangabad: मुंबईतील घराच्या काचा फोडल्या, औरंगाबाद शहरातील अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांच्या घरावर दगडफेक.
औरंगाबाद : मंत्री अब्दुल सत्तार (Abdul sattar) हे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह भाषा वापरल्याने ते नव्या वादात सापडले आहेत. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याने त्यांच्या मुंबईतील घराच्या अज्ञातांनी काचा फोडल्या. त्यानंतर आता सत्तारांच्या औरंगाबाद शहारातील मंत्री अब्दुल सत्तारांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कृषी मंत्री सत्तारांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. सत्तारांच्या घरावर दगडफेक झाल्यानंतर परिसरातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून सत्तारांवर टीकेचा भाडीमार होत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभरात सत्तारांच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. सत्तारांच्या मुंबईतील घरातील काच्या फोडल्या आहेत. त्यानंतर आता अब्दुल सत्तार यांच्या औरंगाबाद शहरात कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून कृषी मंत्र्यांच्या घरावर ही दगडफेक करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून जोरदार निषेध करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या हातात खोके घेऊन सत्तारांच्या घरासमोर आंदोलन देखील केले आहे.
मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवली पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीच्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष एडवोकेट इंद्रपाल सिंग यांनी अब्दुल सत्तार यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी निवेदन दिले आहे.
Web Title: Stone pelting at the minister Abdul Sattar house for using offensive language
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App