Home बुलढाणा शेतात कामाला चाललेले लोक अचानक थांबले, शेतातील दृश्य पाहून एकच खळबळ

शेतात कामाला चाललेले लोक अचानक थांबले, शेतातील दृश्य पाहून एकच खळबळ

Buldhana: शेतात अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचलेला मृतदेह (Dead body) आढळल्याने बुलढाण्यातील मेहकर तालुक्यात एकच खळबळ.

Stone-crushed dead body of an unknown person in a field

बुलढाणा: शेतात अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचलेला मृतदेह आढळल्याने बुलढाण्यातील मेहकर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दगडाने ठेचून इसमाची हत्या केल्याची घटना समोर आल्याने  गावात एकच खळबळ उडाली आहे.  मेहकर तालुक्यातील लव्हाळा ते साखरखेर्डा रस्त्यावरील घटना घडली. घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. साखरखेर्डा पोलिसांनी घटनेची नोंद करत अधिक  तपास सुरु केला आहे. सदर व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून अज्ञात व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

याबाबत माहिती अशी की, नेहमीप्रमाणे गावातील लोक आज सकाळी शेतात कामावर चालले होते. यावेळी एका शेताजवळ अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचलेला मृतदेह त्यांनी पाहिला. त्यांनी याबाबत गावकऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली. सदर व्यक्ती कोण आहे? आणि त्याची हत्या कुणी आणि का केली याबाबत अद्याप माहिती कळू शकली नाही. पोलीस मयताची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. सदर व्यक्ती राजस्थानी असल्याचे दिसते. मात्र तो इथे कसा आला याबाबत पोलीस चौकशी करीत आहे.


पुणे:  शिवाजीनगर पुलाखाली नदीपात्रामध्ये अनोळखी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्यक्तीची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. तसेच ही हत्या आहे की आत्महत्या? हे समजू शकलेलं नाही. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Web Title: Stone-crushed dead body of an unknown person in a field

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here