Home अहिल्यानगर अजूनही या दिवसापर्यंत पावसाचा धोका,  कमी दाबाचा पट्टा निर्माण

अजूनही या दिवसापर्यंत पावसाचा धोका,  कमी दाबाचा पट्टा निर्माण

Breaking News | Ahilyanagar:  कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा प्रभाव, : पावसाचा धोका अजून २९ ऑक्टोबर पर्यंत कायम राहील.

still a risk of rain till this day, a low pressure area is forming

राहाता: पावसाचा धोका अजून २९ ऑक्टोबर पर्यंत कायम राहील, असा अंदाज हवामान अभ्यासक व जलसंपदाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी सार्वमतशी बोलताना व्यक्त केला.

श्री. निर्मळ म्हणाले, परतीचा मान्सून महाराष्ट्रातून १३ ऑक्टोबरला हवामान खात्याच्या प्रचलित नियमानुसार कागदोपत्री निघून गेला असला तरी प्रत्यक्षात तो महाराष्ट्रात ठाण मांडून बसला आहे. २० ऑक्टोबरनंतर पूर्ण उघडीप सुरु झाली होती आणि ऑक्टोबर हीटही जाणवत होती. त्याचा परिणामी स्थानिक वातावरण तयार होऊन ठिकठिकाणी भाग बदलत दुपारनंतर दहा-पंधरा मिनिटे मुसळधार सरी कोसळत आहेत. ऑक्टोबर २० ते २४ तारखांच्या दरम्यान अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याच्या प्रभावामुळे अहिल्यानगर व नाशिकसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ तसेच कोकण या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे.

या कमी दाबामुळे चक्रीवादळ तयार होऊन महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्येही पर्जन्यवृष्टी होणार आहे. महाराष्ट्राच्या सर्व भागात हा कमी दाबाचा प्रभाव २१ ऑक्टोबरपासून दिसत आहे. कोकणात २५ ते २९ ऑक्टोबरला मुसळधार वादळी स्वरूपाचा पाऊस होईल. अहिल्यानगर आणि नाशिकसह मध्य महाराष्ट्रात २५, २८, २९ ऑक्टोबरला हलका ते मध्यम आणि २६ व २७ऑक्टोबरला भाग बदलत मुसळधार वादळी पाऊस पडेल. विदर्भामध्ये २५ व २६ ऑक्टोबरला अतिमुसळधार तर २७, २८, २९ ऑक्टोबरला मुसळधार पाऊस पडेल. मराठवाडा व खांदेशमध्ये २५ ते २९ ऑक्टोबरला मध्यम पाऊस पडेल.

अरबी समुद्रातील चक्रीवादळ ओमानकडे आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ बिहार, पश्चिम बंगालच्या दिशेने गेल्यामुळे महाराष्ट्रात सुरू असलेला सध्याचा पाऊस ३० ऑक्टोबरच्या दरम्यान बंद होईल आणि उत्तरेकडील वारे दक्षिणेकडे वाहू लागल्याने थंडी सुरू होईल.

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात ला-निनोचा प्रभाव वाढू लागल्याने पावसासाठी अधूनमधून अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. अर्थात हे त्यावेळी असलेल्या इतर घटकांच्या परिस्थितीवर अवलंबून असेल. हवामान बदलाचा परिणाम यावर्षी जास्त ठळकपणे जाणवला आहे. पाऊस पडण्याच्या पद्धतीत झालेला आमूलाग्र बदलही अनुभवास आला आहे. सरासरी पाऊसमानात दहा ते पंधरा टक्के वाढ झाली असली तरी कमी कालावधीत धुंवाधार पाऊस आणि दोन पावसात दीर्घकालीन खंड यामुळे जीवितहानी बरोबरच शेती, पिके तसेच घरदार यांची अपरिमित हानी झाली आहे. जागतिक तापमान वाढीमुळे भविष्यातही अशीच परिस्थिती राहील, किंबहुना त्यात वाढ होईल. या बदलांना सामोरे जाण्यासाठी पारंपारिक पद्धतींमध्ये बदल करणे क्रमप्राप्त आहे, असेही श्री. निर्मळ म्हणाले.

Breaking News: still a risk of rain till this day, a low pressure area is forming

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here