अहिल्यानगर: सावत्र बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Breaking News | Ahilyanagar Crime: सावत्र बापाने आपल्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्यावर अत्याचार.
राहुरी : माणुसकीला काळिमा फासणारी घटना राहुरी तालुक्यातील एका गावात रविवारी (दि. १) सायंकाळच्या सुमारास घडली. सावत्र बापाने आपल्या ११ वर्षीय अल्पवयीन मुलीला मारहाण करून तिच्यावर अत्याचार केला. नराधम बापाला पोलिस पथकाने गजाआड केले.
मध्य प्रदेशमधील एक महिला गेल्या काही दिवसांपासून राहुरी तालुक्यात वास्तव्य करते. तिची ११ वर्षीय अल्पवयीन मुलगी, मुलगा तसेच दुसरा पती यांच्यासह ती राहते. रविवारी
सायंकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान त्या अल्पवयीन मुलीचा सावत्र बाप हा गावातून अंडी घेऊन देतो असे सांगून त्या अल्पवयीन मुलीला घेऊन घराबाहेर गेला. नंतर त्या नराधम सावत्र बापाने परिसरातच त्या अल्पवयीन मुलीला चापटीने मारहाण केली. नंतर तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.
पीडित मुलीच्या आईला घटना समजल्यावर ती, तिची मुलगी व मुलाला घेऊन घराबाहेर पडली. रात्रीच्या वेळी रस्त्याने जात असताना एका तरुणाने पीडित महिलेची चौकशी केली. तिला आधार देऊन एका वस्तीवर नेले. तेव्हा महिलेने ११२ नंबरवर फोन करून
घडलेला प्रकार सांगितला. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान फडोळ, हवालदार वाल्मीक पारधी, प्रवीण आहिरे, संतोष राठोड, गणेश सानप, जयदीप बडे, आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस पथकाने आरोपीला सोमवारी पहाटे त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेत गजाआड केले.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून आरोपीविरुद्ध अत्याचार व पोक्सोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
Breaking News: Stepfather abused minor girl