Home संगमनेर संगमनेर: राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, मराठा आरक्षण आंदोलन

संगमनेर: राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, मराठा आरक्षण आंदोलन

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा.

State Govt's Symbolic Funeral, Maratha Reservation Movement

संगमनेर: मराठा आरक्षणासाठी आंदोलन चांगलेच तापलं आहे.  संगमनेर तालुक्यातील बिरेवाडी गावात सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. याशिवाय नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आंदोलन करण्यात येत आहेत.

संगमनेर तालुक्यातील साकूर पाठरभागात सकल मराठा समाजाच्यावतीने बिरेवाडीत रविवारी राज्य सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. ही अंत्ययात्रा गावठाणातील स्मशानभूमीत नेत रुढीपरंपरेनुसार अंत्यविधी करण्यात आला. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याशिवाय बिरेवाडी ग्रामस्थांनी आरक्षण मिळेपर्यंत नेत्यांना गावात प्रवेश नसल्याचा निर्णय जाहीर केला. तसेच आगामी प्रत्येक निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय देखील ग्रामस्थांनी घेतला आहे.

तसेच संगमनेर शहरात सकल मराठा समाजाच्या सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भेट देण्यासाठी आलेल्या राज्याच्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना काही आंदोलकांच्या घोषणांना सामोरे जावे लागले. “विखे पाटील परत जा, परत जा”, “एक मराठा लाख मराठा” अशा घोषणांनी विरोध करणाऱ्या आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Web Title: State Govt’s Symbolic Funeral, Maratha Reservation Movement

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here