Home संगमनेर राज्यातील सरकार हे वसुली सरकार: राधाकृष्ण विखे पाटील

राज्यातील सरकार हे वसुली सरकार: राधाकृष्ण विखे पाटील

State government is the recovery government Radhakrishna Vikhe Patil 

संगमनेर: राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे वसुली सरकार असल्याची टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil ) यांनी केली आहे. महाविकास आघाडी फक्त वसुली करते, सरकारला फक्त घ्यायचेच माहिती आहे. द्यायचे माहित नाही. मागील दोन वर्षात सरकारने कवडीचीही मदत शेतकऱ्यांना केली नाही. दारूचे कर माफ करते मात्र मोफत वीज देऊ शकत नाही. तुम्ही डीप्या बंद केल्या उद्या तुम्हाला बंद करण्याची वेळ आणू नका शेतकऱ्यांना वीज बिलासाठी वेठीस धरत असाल महावितरण कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या अन्द्लाना करण्याचा इशारा भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.

संगमनेर तालुक्यातील वीज शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नाच्या बाबत वीज वितरण कंपनी कार्यालयावर आमदार विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. महावितरण कंपनीच्या उप विभागीय कार्यालयासमोर ठिय्या देऊन शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले. यावेळी महाविकास आघाडी सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

Web Title: State government is the recovery government Radhakrishna Vikhe Patil 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here