Home नांदेड एसटी बस पुलावर अडवली, पेट्रोल टाकून बस पेटवली अन….

एसटी बस पुलावर अडवली, पेट्रोल टाकून बस पेटवली अन….

पैनगंगा नदीवरील पुलावर काही अज्ञातांनी बस पेटविल्याने (Fire) खळबळ.

ST bus stopped on the bridge, petrol was poured on the bus and set on fire

यवतमाळ: नांदेड वरून नागपूरला जात असलेली नांदेड आगाराची एसटी बस ( एम एच २० -जीसी ३१८९) उमरखेड जवळ पैनगंगा नदीवरील पुलावर काही अज्ञातांनी पेटविल्याने खळबळ उडाली आहे . सुदैवाने बस मधील सर्वच ७३ प्रवाशी खाली उतरल्याने हा अनुचित घटना घडली नाही . नांदेड – नागपूर बस नांदेड वरून रात्री नऊच्या दरम्यान निघाली होती. रात्री ११ च्या दरम्यान बस यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीत येत असताना उमरखेड तालुक्यातील गोजेगाव जवळ पैनगंगा नदीच्या पुलावर बस येताच मोटारसायकलवर येणाऱ्या काही जणांनी बस थांबविली . बसचा चालक बी .डी. नाईकवाडे यांनी बस थांबवली असता काही जण बसजवळ धावत आले . काही तरी विपरीत घडणार असल्याचे लक्षात येताच बस मधील सर्च च ७३ प्रवासी बस मधून खाली उतरले . सर्व प्रवासी ,बसचा चालक , वाहक खाली उतरताच त्याठिकाणी असलेल्या अज्ञातांनी बसवर पेट्रोल टाकून बस पेटवून दिली .

काहीवेळातच बस जळून खाक झाली . रस्त्यातच बस पेटल्याने नागपूर तुळजापूर महामार्गावरील वाहतूक बंद पडली घटनेची माहिती मिळताच नांदेड व उमरखेड येथील एसटी विभागाचे अधिकारी घटनास्थळी आले. उमरखेड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली . रात्री उशिरा बस रस्त्याच्या बाजूला केल्यावर वाहतूक सुरु झाली.  बस पेटविणारे अज्ञात लोक कोण होते याचा शोध पोलिस घेत आहेत .

Web Title: ST bus stopped on the bridge, petrol was poured on the bus and set on fire

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here