अहिल्यानगर: एसटी बस कंटेनरवर आदळली; बस चालकासह आठ जखमी
Ahilyanagar Accident: एसटी महामंडळाची बस आणि कंटेनरचा आज (दि. २२) रविवारी सायंकाळी अपघात, कोपरगाव येथील घटना; जखमी रुग्णालयात, कंटेनर चालक पसार.
कोपरगाव : अहिल्यानगर- मनमाड महामार्गावर कोपरगाव येथील कातकडे पेट्रोल पंपाजवळ एसटी महामंडळाची बस आणि कंटेनरचा आज (दि. २२) रविवारी सायंकाळी अपघात झाला. या अपघातात बस चालकासह आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघात एवढा भीषण होता की एसटी बसच्या समोरच्या भागाचे मोठे नुकसान झाले. राज्य परिवहन महामंडळाची बस शिर्डीकडून छत्रपती संभाजीनगरकडे प्रवासी घेऊन निघाली होती. सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास कोपरगाव शहर हद्दीत अहिल्यानगर- मनमाड महामार्गावर बेट नाका परिसरात कातकडे पेट्रोल पंपासमोर बस आली असताना समोर चाललेल्या कंटेनरवर जोरात धडकली. बसचे चालकाच्या बाजूने मोठे नुकसान झाले. अपघातस्थळी एकच गोंधळ उडाला. स्थानिक, प्रवाशांनी बसमधील जखमींना बसमधून बाहेर काढले.
जखमींमध्ये बस चालकासह आशा विलास गायकवाड, आरती पठारे, कांताबाई डेंगळे, शांताबाई डेंगळे, आशा राजपूत, सुजाता सचिन लुनावत, कल्याण सहारे या आठ जणांचा समावेश आहे. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला.
Web Title: ST bus hits container Eight injured
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News