Home जळगाव एसटी बसचा भीषण अपघात; टायर फुटल्यानं 41 प्रवाशांची बस झाडावर आदळली

एसटी बसचा भीषण अपघात; टायर फुटल्यानं 41 प्रवाशांची बस झाडावर आदळली

Bus Accident:  एसटी बसचे टायर फुटून ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याची घटना.

ST Bus Fatal Accident A bus carrying 41 passengers hit a tree 

जळगाव: एसटीच्या अपघात घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढतच आहे.  आता एसटी बसचे टायर फुटून ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत 8 ते 10 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या बसमधून एकूण 41 प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती समोर येत आहे.

याबाबत  अधिक माहिती अशी की जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर-कुऱ्हा रस्त्यावर हा अपघात झाला आहे. मुक्ताईनगर, काटेलधाम बसचं टायर फुटलं. बसचं टायर फुटल्यानं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. या घटनेत आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

या बसमधून एकूण 41 प्रवासी प्रवास करत होते, बसचं टायर फुटून हा अपघात झाला. चालकाच्या सतर्कतेमुळं मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातामध्ये सात ते आठ लोक किरकोळ जखमी झाले असून, सुदैवानं जिवीतहानी झालेली नाही. 

मुक्ताईनगर आगाराची एमएच २० बीएल-१७७० या क्रमांकाची बस आज काटेलधाम येथून निघून जळगावकडे येत होती. दरम्यान, मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा-काकोडा गावाजवळ असलेल्या पारंबी फाट्याजवळ समोर चालत असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न बस रस्ता लागत कापलेला झाडाच्या बुंध्यावरून गेले त्यामुळे बसचे पुढचे टायर अचानक फुटले. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस ही बाजूलाच असलेल्या शेताच्या बांधावर जाऊन धडकली.

या अपघातामध्ये नऊ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. यात प्रतीक्षा सुनील झांबरे ( २२, रा. आळंद ); समाधान उखर्डु तायडे ( ६९, रा. मानेगाव ); कमल गोविंदा पवार ( ५९, रा. वढोदा ); जानकोर त्र्यंबक महाले ( ७५, रा. वढोदा); नलीनी भास्कर न्हावी ( ७०, रा. वढोदा); अनुराधा पाटील ( ३५, मेळसांगवे); कस्तुराबाई भोलणकर ( ७०, रा. शिरसोली); सपना विनोद पाटील ( २७, रा. जामनेर); सार्थक विनोद पाटील (२, रा. जामनेर) यांचा समावेश आहे.

Web Title: ST Bus Fatal Accident A bus carrying 41 passengers hit a tree 

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here