Home पुणे एसटी बसचालकाला बसस्थानकावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

एसटी बसचालकाला बसस्थानकावर हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

BUS Driver Heart Attack Death: एसटी बसचालकाला जेजुरी बसस्थानकावर हृदयविकाराचा तीव्र झटका, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे निधन.

ST bus driver dies of heart attack at bus stand

बारामतीः बारामती आगाराच्या एसटी बसचालकाला जेजुरी बसस्थानकावर हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यावेळी मुरूम ते पुणे प्रवासाला निघालेली एसटी बस स्थानकावर थांबल्यानंतर एसटीबस चालक हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने स्थानकारवरच बेशुध्द पडले. यावेळी त्यांना जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालय येथे त्वरित दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे निधन झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.

निलेश एकनाथ शेवाळे (वय ५२) असे चालकाचे नाव आहे. शेवाळे हे गुरुवारी (दि ३०) मुरुम येथून पुणेच्या दिशेने निघाले होते. यावेळी सकाळी ७.३० च्या सुमारास एसटी बस जेजुरी बसस्थानकावर आल्यानंतर शेवाळे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मात्र, त्यातच ते बेशुध्द पडले. त्यांना जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान एसटीबसमध्ये काही प्रवाशी देखील होते. मात्र, जेजुरी येथे एसटी बस थांबल्यावर ही घटना घडली.

याबाबत बारामती आगाराचे आगार व्यवस्थापक रविराज घोगरे यांनी सांगितले कि, जेजुरी बसस्थानकात एसटी बस थांबल्यावर निलेश शेवाळे यांना त्रास जाणवला. शेवाळे यांनी याबाबत त्यांच्या सहकाऱ्यांना सांगितले. मात्र, ते बेशुध्द झाले. त्यांना तेथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शेवाळे यांच्यावर त्यांच्या निरा या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: ST bus driver dies of heart attack at bus stand

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here