Home Accident News अहमदनगर ब्रेकिंग! घाटात एसटी बसला अपघात

अहमदनगर ब्रेकिंग! घाटात एसटी बसला अपघात

Breaking News | Ahmednagar Accident:  इमामपूर घाटात एसटी बसचा अपघात झाल्याची घटना.

ST bus accident in Ghat

अहमदनगर : छत्रपती संभाजीनगर महामार्गावर इमामपूर घाटात मंगळवारी (दि. २३) दुपारी एसटी बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे.  सुदैवाने या अपघातात कोणी जखमी झाले नाही.

इमामपूर घाटातील तीव्र उतारावर वाडा आगाराच्या वाडा- जालना (एम. एच.१३ सी. यु. ६९२३) एसटी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडला. एसटी नगरकडून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. एसटी महामार्गाच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उतरली गेली अन् डोंगराच्या कडेच्या आधारावर उभी राहिली. दैव बलवत्तर म्हणून सर्व प्रवासी सुखरूप राहिले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिस व वनमित्र पथकातील सदस्य मायकल पाटोळे, बाळासाहेब अपघातस्थळी पाटोळे भेट यांनी दिली. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार रमेश थोरवे, मोहम्मद शेख यांनी घटनास्थळी भेट दिली.

पांढरी पूल परिसरातील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु त्याची दखल घेतली गेलेली नाही. आजच्या अपघातात जीवित हानी झाली नसली, तरी स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला.

Web Title: ST bus accident in Ghat

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here