दहावी बारावीचा निकाल वेळेतच, या महिन्यात लागणार निकाल | SSC-HSC Board Result 2023
SSC-HSC Board Result 2023: दहावीचा निकाल १० जूनपर्यंत तर बारावीचा निकाल २ जूनपूर्वी लागणार, असं बोर्डामार्फत सांगण्यात आलं.
पुणे: राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. अशात जुन्या पेन्शन योजनेमुळे पेपर तपासणीच्या कामात अडचणी येत आहेत. त्यामुळे दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालात विलंब होण्याची शक्यता आहे. अशात बोर्डाने निकालाची तारीख सांगितली आहे. दहावीचा निकाल १० जूनपर्यंत तर बारावीचा निकाल २ जूनपूर्वी लागणार, असं बोर्डामार्फत सांगण्यात आलं आहे.
या वर्षी इयत्ता दहावीचे १४ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तसेच बारावीचे १५ लाख ३० हजार विद्यार्थींनी परीक्षा दिली आहे. कोरोना महामारीमुळे ‘शाळा तेथे केंद्र’ अशा पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या. यामध्ये १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अशात यंदा बोर्डाच्या परीक्षा कॉपी मुक्त घेण्यात आल्या आहेत. काही अपवाद वगळता पेपर फुटीच्या घटना नियंत्रित आल्या आहेत.
इयत्ता दहावी-बारावीचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी बोर्डाची तयारी सुरू झाली आहे. निकाल उशिरा लागल्यास त्याचा थेट परिणाम पुढील प्रवेशावर होतो. त्यामुळे अशी अडचण येऊ नये अशा पद्धतीने बोर्डाने काम सुरू केले आहे.
काही अडचणींमुळे फेब्रुवारी-मार्च महिन्यातील बोर्डाच्या परीक्षेला अनेक विद्यार्थ्यांना बसता आले नाही. त्यामुळे निकालात ते अनुर्तीर्ण होतील. अशा विद्यार्थ्यांची जूनअखेरीस पुरवणी परीक्षा घेतली जाणार आहे. यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळता येणार आहे.
Web Title: SSC-HSC Board Result 2023 in June Month
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App