अकोले: क्रिडा शिक्षक श्री.ऋषिकेश वालझाडे रजत पदकाने सन्मानित.
अकोले: क्रिडा शिक्षक श्री.ऋषिकेश वालझाडे रजत पदकाने सन्मानित.
पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी – विद्यार्थी जडणघडणीत शिक्षक हा महत्वाचा दुवा असतो. सुर्जनशिल पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतात.विदयार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात पुस्तकी ज्ञानाबरोबरच शारिरीक विकासही तितकाच महत्वाचा मानला जातो. क्रिडा क्षेत्रात विद्यार्थी घडवण्यात शिक्षक हा तितकाच महत्वाचा दुवा आहे. यास प्रेरणा म्हणून क्रिडा क्षेत्रात विविध पदक देऊन विशेष यश संपादन करणाऱ्यास सन्मानित करण्यात येते. याच उद्देशाने अकोले येथील मारूतीराव कोते अभिनव पब्लीक स्कूलचे क्रिडा शिक्षक ऋषिकेश संजय वालझाडे यांनी महाराष्ट्र सिनिअर टिम मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याबद्दल त्यांना नुकत्याच जयपुर येथे संपन्न झालेल्या सातव्या राष्ट्रीय मिनीगोल्फ स्पर्धात रजत पदक देऊन सन्मानित करण्यात आले. तर याच शाळेतील इयत्ता नववीचा विद्यार्थि अभिराज धुमाळ याने महाराष्ट्र ज्युनियर टिम मध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्य पदक मिळविले. यामध्ये एकूण तेरा राज्य सहभागी झाले होते.
यावेळी राजस्थानचे खेल अध्यक्ष प्रो. सुमन शर्मा, मिनीगोल्फ असोसियसनचे अध्यक्ष डॉ. अरूण माथूर, राजस्थान मिनीगोल्फ असोसियसनचे सचिव रमेश सिंग, येवतीकर-महासचिव मिनीगोल्फ फेडरेशन ऑफ इंडिया डॉ. सुरज सिंह, टेकनिकल कमेटी मिनीगोल्फ फेडरेशन ऑफ इंडियाचे चेअरमन राजेश शेंडकर आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पदक देऊन सन्मानीत करण्यात आले.
या सन्मानाबद्दल अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले, भाऊसाहेब नाईकवाडी, विक्रम नवले, प्राचार्य अलफोन्स डी, सौ. श्रीवास्तव तसेच अभिनव परीवाराने अभिनंदन केले तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या घवघवीत यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
Website Title: Sports teacher Mr. Rishikesh Walzade honored by the Silver Medal
संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
संगमनेर अकोले बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. Facebook Page.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
Get Latest Marathi News, Marathi Batmya Today Live & Marathi News Live from Politics, Sports,Entertainment News, Sangamner Taluka News, Akole Taluka News, Marathi Batmya Live and मराठी बातम्या लाइव from all cities of Maharashtra.
प्रमोटेड बातम्या: