Home बीड धक्कादायक! मुलगा धावत आला, स्फोट झाला अन् वडिलांचा मृत्यू

धक्कादायक! मुलगा धावत आला, स्फोट झाला अन् वडिलांचा मृत्यू

Beed: मुलगा धावत आला, परंतु त्या अगोदरच जिलेटिनचा स्फोट झाला आणि मुलाच्या डोळ्यासमोर पित्याचा मृत्यू (Death) झाला.

son runs, the explosion and the death of the father

पिंपळनेर | बीड: कोणी चोरून नेऊ नये, यासाठी शेतातील बांधावर जिलेटिनच्या कांड्या लपवून ठेवल्या. तोच बांध सकाळी वडिलांनी पेटवून दिला. हे पाहताच मुलगा धावत आला, परंतु त्या अगोदरच जिलेटिनचा स्फोट झाला आणि मुलाच्या डोळ्यासमोर पित्याचा मृत्यू झाला. मुलगा व अन्य एकजण यात गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी बीड तालुक्यातील राक्षसभुवन (देवीचे) येथे घडली.

आप्पासाहेब सोपान मस्के (वय ५७) असे मृताचे नाव असून, ऋषिकेश (वय २२) हा त्यांचा मुलगा व अन्य एक जण जखमी झाले आहेत. मस्के यांच्या शेतात विहीर खोदण्याचे काम सुरू आहे. आतमधील खडक जिलेटिनचा स्फोट करून फोडला जातो. याच कांड्या येथील काही लोकांनी

बाजूलाच असलेल्या बांधावर कोणी नेऊ नये म्हणून लपवून ठेवल्या होत्या. याची माहिती केवळ मजूर आणि ऋषिकेश मस्के यांना होती… आप्पासाहेब मस्के यांनी बांध पेटवून दिला. हा प्रकार मुलाला समजताच तो धावत गेला. परंतु, काही बोलण्याआधीच या जिलेटीन कांड्यांचा मोठा स्फोट झाला.

वडील ५० फूट लांब जाऊन पडले

हा स्फोट इतका भयानक होता की, आप्पासाहेब मस्के हे ४० ते ५० फूट लांब जाऊन पडले. त्यांचे शरीर पूर्ण छिन्नविछिन्न झाले होते. अंगावरील कपड्यांच्या पूर्ण चिंधड्या झाल्या. वैद्यकीय अधिकायांनी त्यांचे जागेवरच शवविच्छेदन केल्याचे सांगण्यात आले.

Web Title: son runs, the explosion and the death of the father

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here