अकोलेतील घटना: मुलाने डोक्यात खोरे टाकून आईचा केला खून
Akole Murder Case: वाद सोडविण्यासाठी आई गेली असता मुलाने तिला धक्काबुक्की करून तिच्याच डोक्यात खोरे टाकून ठार मारले.
अकोले: लहान मुलास औषध पाजण्याच्या कारणातून पती-पत्नी यांच्यात वाद झाला. वाद सोडविण्यासाठी आई गेली असता मुलाने तिला धक्काबुक्की करून तिच्याच डोक्यात खोरे टाकून ठार (Murder) मारले. ४८ वर्षीय पमाबाई किसन पवार असे दुर्दैवी आईचे नाव आहे. ही घटना शहरातील सुभाष चौक परिसरात गुरुवार दि. ११ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी विनोद किसन पवार (वय २६) याच्यावर कलम ३०२ व ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. आरोपी विनोद याने त्याचा मोठा भाऊ याच्यावर देखील जीवघेणा हल्ला केला असून जखमी भावावर उपचार सुरू आहेत. आरोपी हा दारू प्यायला होता, दारूमुळे ही घटना घडल्याचे समोर आले.
आरोपी विनोद हा दारू पिऊन घरी आला होता. घरात लहान बाळ असल्यामुळे त्याला औषध पाजण्याहून पती-पत्नी दोघांमध्ये वाद झाले. हे वाद टोकाला गेल्यामुळे दारुड्या विनोदने त्याच्या पत्नीस मारहाण सुरू केली. भांडण सोडण्यासाठी विनोदची आई गेली. त्याने आईलादेखील धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. घराच्या शेजारीच राहणारा त्याचा मोठा भाऊ संतोष पवार हा मध्ये आला. त्याने देखील विनोदला समजून सांगण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, आई त्यास समजून सांगत होती, विनोदने शेजारी पडलेले खोरे (फावडे) उचलले आणि थेट आईच्या डोक्यात मारले. काही क्षणांत रक्ताच्या थारोळ्यात त्याची आई पडली. तेच खोरे आरोपी विनोद याने मोठा भाऊ संतोष याच्या डोक्यात मारले. मात्र, त्याने प्रसंगावधान राखून तो वार चुकविला. मात्र, तरीदेखील डोक्यात खोलवर जखम झाली. डोक्यातून प्रचंड सुनावण्यात आली आहे.
रक्त वाहू लागले. हा प्रकार पाहिल्यानंतर आरोपी विनोद याने तेथून पळ काढला आणि तो पसार झाला. मात्र, आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली पाहून संतोषने स्वतःला सावरले आणि आपल्या जवळच असणाऱ्या चुलतभावांच्या साहाय्याने आईला दवाखान्यात नेले. अकोले ग्रामीण रुग्णालयात तात्पुरता उपचार केला आणि पुढे हलविण्यास सांगितले. संगमनेर गाठण्यापूर्वीच तिने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे तिला पुन्हा अकोले ग्रामीण रुग्णालयात आणले गेले. तेथे खात्री केली असता महिला मयत झालेली होती. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना संबंधित घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनेची चौकशी केली आणि जखमी असलेले संतोष पवार यांच्या फिर्यादीहून विनोद पवार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, तर गुन्हा दाखल होताच सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांच्या पथकाने विनोदला अटकदेखील केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Web Title: son murder his mother by hitting her on the head