अहमदनगर धक्कादायक! मुलाने केला वडिलांचा खून, स्लॅब वरुन ढकुलन…..
Breaking News | Ahmednagar: स्लॅब वरुन ढकुलन दिल्याने वडिलांचा जागीच मृत्यू.
शेवगाव: कौटुंबिक वादातून जीव घेण्यापर्यंतच्या घटना घडू लागल्या आहेत. पती पत्नीच्या वादातही खून झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पण आता शेवगाव तालुक्यात मुलाचे वडिलांसोबत वैर निर्माण झाल्याचे समोर आले आहे. स्लॅब वरुन ढकुलन दिल्याने वडिलांचा जागीच मृत्यू
मुलाने किरकोळ वादाच्या कारणावरुन दारुचे नशेत वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यासंदर्भांत मुलाच्या आईने पोलिसांना फिर्याद दिली आहे. विठ्ठल मनाजी केदार ( वय ५५ वर्षे ) यांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सोपान विठ्ठल केदार (रा. मंगरुळ , शेवगाव) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
किरकोळ वादाच्या कारणावरुन दारुचे नशेत सोपान केदार याने वडील विठ्ठल केदार यांच्या पोटात, चेह-यावर, छातीवर तसेच डोक्यावर लाथबुक्यांनी मारले. तसेच स्लॅब वरुन ढकुलन दिल्याने विठ्ठल केदार यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत आई अंबिका केदार यांनी मुलगा सोपान केदार याच्याविरुध्द आज सोमवार दि.७ रोजी फिर्याद दिली. शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक समाधान नांगरे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवुन वेगवेगळी दोन पोलीस पथके मंगरुळ, चापडगाव, बोधेगाव भागात रवाना करण्यात आले होते. तसेच आरोपी सोपान विठ्ठल केदार यास पोलीस पथकाने आरोपींची ओळख पटवुन ताब्यात घेतले. नमुद गुन्ह्याविषयी विश्वासात घेवुन विचारपुस केली असता आरोपीने खुनाच्या गुन्ह्यात कबुली दिल्याने अटक करण्यात आली.
Web Title: Son killed father, pushed from slab
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study