Home अहमदनगर अहमदनगर: सासुरवाडीला आलेल्या जावयाचा बेदम मारहाण करून खुन

अहमदनगर: सासुरवाडीला आलेल्या जावयाचा बेदम मारहाण करून खुन

Breaking News | Ahmednagar: एका कार्यक्रमासाठी पत्नीच्या माहेरी केडगाव येथे आलेल्या युवकाला पती पत्नीच्या वादातून बेदम मारहाण करत त्याचा खून केल्याची घटना.

son-in-law who came to his father-in-law's house was brutally beaten to death

अहमदनगर : एका कार्यक्रमासाठी पत्नीच्या माहेरी केडगाव येथे आलेल्या युवकाला पती पत्नीच्या वादातून बेदम मारहाण करत त्याचा खून (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. खुनानंतर सदर इसमाचा मृतदेह चाँदबीबी महालाजवळ बारद्री (ता. नगर) शिवारात फेकून देत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी मयताची पत्नी व तिच्या माहेरचे नातेवाईक अशा ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी मयताची पत्नी व मेव्हुण्याला अटक केली आहे.

प्रशांत जगन्नाथ घाटविसावे (वय २८, रा. केळ पिंपळगाव, ता. आष्टी, जि. बीड), असे मयताचे नाव आहे. तर त्याच्या खून प्रकरणी त्याची पत्नी कल्याणी प्रशांत घाटविसावे (मूळ रा. केळ पिंपळगाव, हल्ली रा. शास्त्रीनगर, केडगाव), सासरा सोमनाथ बनकर, सासू वैशाली सोमनाथ बनकर, मेव्हणा अजय सोमनाथ बनकर, मेव्हणी प्रियंका सोमनाथ बनकर (सर्व रा. शास्त्रीनगर, केडगाव), अजय बनकर चा मेव्हणा मोहित दिनेश पाडळे (रा. बोहरी चाळ, रेल्वे स्टेशन रोड, केडगाव) यांच्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३०२, ३२३, १४३, १४७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मयत प्रशांत घाटविसावे याचा चुलत भाऊ किशोर बापूराव घाटविसावे (रा. केळ पिंपळगाव, ता. आष्टी, जि. बीड) याने नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.मयत प्रशांत घाटविसावे हा मंगळवारी (दि. २३) केडगाव येथे पत्नीच्या माहेरी कार्यक्रमासाठी आलेला होता. रात्री पती – पत्नीच्या वादातून त्याचे व त्याच्या सासरच्या लोकांचे वाद झाले. ही बाब त्याने आपल्या कुटुंबियांना फोन करून कळविली होती. त्यानंतर बुधवारी (दि. २४) त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याचा मोबाईल बंद लागला. गुरुवारी (दि. २५) सकाळपासूनही त्याच्याशी संपर्क न झाल्याने त्याला शोधण्यासाठी त्याचे भाऊ व इतर नगरकडे येत असताना दुपारी त्यांना फोनवर समजले की, प्रशांत याचा मृतदेह बारदरी (ता. नगर) येथे आढळून आला आहे. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी तेथे धाव घेत पाहिले असता, मयत प्रशांत याच्या मृतदेहावर मारहाणीच्या खुणा दिसल्या. त्यामुळे त्याचा चुलत भाऊ किशोर बापूराव घाटविसावे याने गुरुवारी रात्री नगर तालुका पोलिस ठाण्यात मयताची पत्नी व इतर नातेवाईक, अशा ६ जणांच्या विरोधात फिर्याद दिली.

गुन्हा दाखल होताच स.पो.नि. प्रल्हाद गिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे, महिला पोना. मोहिनी कर्डक, पोकॉ. विक्रांत भालसिंग, संभाजी बोराडे यांच्या पथकाने मयताची पत्नी कल्याणी प्रशांत घाटविसावे व मेव्हुणा अजय सोमनाथ बनकर यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करीत आहेत.

Web Title: son-in-law who came to his father-in-law’s house was brutally beaten to death

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here