Home अहिल्यानगर अहिल्यानगर: मुलगा घरी आला तर आई रक्ताच्या थारोळ्यात… महिलेची हत्या

अहिल्यानगर: मुलगा घरी आला तर आई रक्ताच्या थारोळ्यात… महिलेची हत्या

Breaking News | Ahilyanagar News: महिलेच्या डोक्यात काहीतरी वस्तूने वार करून किंवा डोके जमिनीवर आपटून खून करण्यात आल्याची घटना.

Son comes home, mother covered in blood... woman killed

अहिल्यानगर:  पिंपळगाव माळवी (ता. नगर) शिवारातील कराळे वस्तीवर एका महिलेचा खून करण्यात आला. लताबाई नानाभाऊ कराळे (वय 50, रा. पिंपळगाव माळवी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. डोक्यात काहीतरी वस्तूने वार करून किंवा डोके जमिनीवर आपटून हा खून करण्यात आला असावा. मात्र खुनाचे कारण अद्याप समजू शकले नसल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी दिली.

गुरूवारी दुपारी 12 ते सायंकाळी पाचच्या दरम्यान ही घटना घडली. त्यावेळी लताबाई घरी एकट्याच होत्या. त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. पिंपळगाव माळवी शिवारातील वस्तीवर नानाभाऊ कराळे यांचे कुटुंब राहते. नानाभाऊ कराळे व त्यांचा मुलगा कामानिमित्त गुरूवारी दुपारी बाहेर गेले होते. त्यावेळी लताबाई कराळे या एकट्याच घरी होत्या. सायंकाळी पाचच्या सुमारास नानाभाऊ व त्यांचा मुलगा घरी आल्यानंतर लताबाई या रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पडलेल्या दिसून आल्या. त्यांच्या डोक्याला मार लागलेला होता.

त्यांनी आरडोआरडा केल्यानंतर वस्तीवर लोक जमा झाले. घटनेची माहिती गावातील पोलीस पाटलांना देण्यात आली. पोलीस पाटलांनी एमआयडीसी पोलिसांना खबर दिली. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) संपतराव भोसले, सहायक निरीक्षक चौधरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी होते.

दरम्यान, भरदुपारी हा खून करण्यात आल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Son comes home, mother covered in blood… woman killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here