Home अकोले भंडारदरा धरणात इतका टक्के पाणीसाठा

भंडारदरा धरणात इतका टक्के पाणीसाठा

Breaking News | Akole:  भंडारदरा पाणलोटात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत असल्याने धरणात पाण्याची आवक.

So much water storage in Bhandardara Dam news

 

भंडारदरा:  उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा पाणलोटात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत असल्याने धरणात पाण्याची आवक होत आहे. काल सायंकाळी या धरणातील पाणीसाठा 12 टक्क्यांवर पोहचला आहे.

11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात यंदा केवळ 9 टक्के साठा होता. त्यात हळुवार आवक होत असल्याने हा पाणीसाठा आता 12 टक्क्यांवर (1351 दलघफू) पोहचला आहे. काल सायंकाळी संपलेल्या 24 तासांत धरणात नव्याने 67 दलघफू पाणी दाखल झाले.

घाटघर, पांजरे आणि रतनवाडीत पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक होत आहे. अधून मधून पडणार्‍या पावसामुळे पाणलोट हिरवागार होऊ लागला आहे. पावसाळी वातावरण टिकून असल्याने गारवा निर्माण झाला आहे. काल दिवसभरात भंडारदरात पडलेल्या पावसाची नोंद 10 मिमी झालेली आहे.

नगर जिल्ह्यातील शेती, पिण्याचे पाणी, उद्योग आणि व्यापाराच्यादृष्टीने महत्त्वाच्या मुळा धरण पाणलोटात काल पावसाच्या सरी कोसळत आहेत. मुळा धरण पाणलोट क्षेत्रात आंबित, पाचनई, कुमशेत हरिश्चंद्रगड परिसरात अधून मधून पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्याने मुळा नदीचा प्रवाह टिकून आहे. 200 ते 300 क्युसेकचा विसर्ग आंबित धरणाच्या सांडव्यावरून सुरू आहे. परिणामी मुळा नदीवरील 600 दलघफू क्षमतेच्या पिंपळगाव खांड धरणाचा पाणीसाठा 218 दलघफूपर्यंत पोहचला आहे. या वर्षात या धरणात आजअखेर 118 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली आहे.

Web Title: So much water storage in Bhandardara Dam

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here